‘विश्वासातून प्रगतीकडे’
बचत खाते
आपली विश्वसनीय शाखा ‘श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट’ मध्ये आजच आपले बचत खाते उघडा व विविध सेवांचा लाभ घ्या.
मुदत ठेव
आपली विश्वसनीय शाखा ‘श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट’ मध्ये विविध ठेव योजनांचा लाभ घ्या आणि आकर्षक व्याजदर मिळवा.
कर्ज योजना
आपली विश्वसनीय शाखा ‘श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट’ मध्ये विविध कर्ज योजनांचा लाभ घ्या आणि आर्थिक अडचणींवर मात करा.

श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. धाराशिव
‘विश्वासातून प्रगतीकडे’ अशी ओळख निर्माण झालेली संस्था म्हणजेच ‘श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट’ को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. धाराशिव. संस्थेची मंजूरी दिनांक १२ सप्टेंबर २०११ रोजी केद्रीय निबंधक, दिल्ली यांच्याद्वारे मिळाली तर दिनांक २० ऑक्टोबर २०११ रोजी संस्थापक अध्यक्ष श्री. दत्तात्रय कुलकर्णी यांनी मुख्य शाखा धाराशिव येथे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करून समृद्धीच्या कार्याला सुरुवात केली. सुरक्षित व सर्वोत्तम सेवेमुळे अल्पावधीतच या संस्थेच्या येडशी, बेंबळी, मुरुड, तुळजापूर, तेर, समर्थनगर (कोर्ट), गवळी गल्ली, आरळी या शाखा कार्यान्वित करण्यात आल्या.
१३ वर्षांची अविरत सेवा
गेली १३ वर्षे आपल्या ग्राहकांना सुरक्षित व सर्वोत्तम सेवा देते आहे.
३६५ दिवस
३६५ दिवस, २४*७ सेवा, आकर्षक योजना आणि व्याज लाभ.
दृष्टीकोन आणि उद्दिष्ट
दृष्टीकोन
ग्राहकांसाठी सहज, वेगवान आणि उच्च दर्जाच्या बँकिंग सेवा उपलब्ध करून देत, संपूर्ण महाराष्ट्रात शाखांचे विस्तारीकरण करणे.
- शाखांचा विस्तार
- उत्तम सेवा
- विश्वासार्हता

उद्दिष्ट
सर्वसामान्य लोकांना आर्थिक सक्षमता देण्यासाठी उत्तम वित्तीय सेवा प्रदान करणे, पारदर्शकता, विश्वासार्हता आणि सतत नाविन्याच्या माध्यमातून सदस्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणे.
- आर्थिक समृद्धी
- सुविधाजनक व्यवहार.
- सुरक्षितता आणि गोपनीयता
- ग्राहक समाधान

आपल्या सेवेत आपल्या सुविधा
Lorem ipsum dolor sit amet consus
QR कोड सुविधा
मोबाईल बँकिंग
IMPS सुविधा
SMS बँकिंग
RTGS सुविधा
NEFT सुविधा
खास आपल्यासाठी ठेव योजनांचा धमाका
आमच्याकडे खाते उघडण्याचे कारण
विस्तृत नेटवर्क - १० शाखा
श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. च्या DIC रोड, छत्रपती संभाजी नगर धाराशिव, खामसवाडी, येडशी, बेंबळी, मुरुड, तुळजापूर, तेर, समर्थनगर (कोर्ट)धाराशिव, गवळी गल्ली धाराशिव, आरळी अशा दहा शाखा आहेत.
अत्याधुनिक सेवा सुविधा
बदलत्या काळानुसार, QR कोड सुविधा, कोअर बँकिंग,IMPS सुविधा, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, SMS बँकिंग, RTGS सुविधा आदी सुविंधाचा उत्तम लाभ तुम्हाला घेता येतो.
25 हजार समाधानी खातेदार
संस्थेचे २५ हजार समाधानी खातेदार आहेत. ते संस्थेतल्या विविध योजनांचा उत्तम लाभ घेत आहेत. सोसायटीने आतापर्यंत अनेक उद्योजकांना कर्ज देत त्यांच्या उद्योगाला भरारी देण्यासाठी हातभार लावला आहे. त्यामुळे तुमच्या स्वप्नांना पाठबळ देण्याचं कामही संस्थेतर्फे होते.
आम्ही आपल्या सोबत आहोत...!
सोने तारण कर्ज
मुदत ठेव कर्ज
सोने खरेदी कर्ज
आवर्त ठेव कर्ज
वैयक्तिक कर्ज योजना
पिग्मी तारण कर्ज
कर्मचारी पगार तारण कर्ज
छोट्या व्यवसायासाठी अल्प मुदत
बचत गट कर्ज योजना
मालमत्ता तारण कर्ज योजना
वाहन तारण कर्ज योजना


मला बचत करायची होती.मी माझी बचत श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि मध्ये ठेवायला सुरूवात केली. मला माझ्या बचतीवर आकर्षक व्याजही मिळायला लागले. त्यामुळे माझे गाडी घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले. श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट कडे तुमची गुंतवणूक एकदम सुरक्षित राहते. त्यामुळे तुम्हीही येथे खाते उघडा आणि आकर्षक योजनांचा लाभ घ्या.


मला व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरक्षित ठिकाणाहून भांडवल हवे होते. दरम्यान मला श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि विषयी कळले. मी तात्काळ अर्ज केला आणि मला कर्ज मिळाले. आज त्यांच्यामुळे माझा व्यवसाय अतिशय उत्तम सुरू आहे. शिवाय माझे भविष्यही सुरक्षित आहे.


वैयक्तिक अडचणी सांगून येत नाही. तसेच माझ्याबाबतीत झाले. अचानक मोठी अडचण आली. त्यातून बाहेर पडण्यासाठी मला वैयक्तिक कर्ज हवे होते. ते सुरक्षित ठिकाणाहून घ्यावे हाच विचार होता. अशावेळी मदतीला आली ती श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. ची 'वैयक्तिक कर्ज योजना'. या योजनेमुळे मला तत्काळ कर्ज उपलब्ध झाले आणि माझी अडचण सोडविण्यासाठी मोठा हातभार मिळाला. त्यामुळे आज मी निश्चिंत आहे.


श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. च्या मोबाईल बॅंकिंग सुविधेमुळे आता माझे व्यवहार अधिक फास्ट झाले आहेत. मोबाईल फोनद्वारे पैसे देणे-घेणे, बिल भरणे, खात्यातील शिल्लक तपासणे आदी गोष्टी मला सहज जमतात. दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागत नाही.शिवाय सुरक्षित आणि खात्रीशीर माहिती मिळते. त्यामुळे इथे खाते सुरू केल्याचा मला आनंद आहे.
