
QR कोड सुविधा
सध्या जमाना हा डिजिटल चा आहे. सर्वजण डिजिटली आपले व्यवहार करतात. अगदी भाजीवाले, किराणा दुकानदारांकडेही आता QR CODE पहायाला मिळतो. रोखीचे व्यवहार करण्यापेक्षा QR CODE वापरून पैसे स्विकारणे जास्त सोपे असते. हीच गरज ओळखून QR CODE द्वारे ग्राहकांकडून पेमेंट स्वीकारताना लागणारे ठराविक रकमेचे कर्ज श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि द्वारे दिले जाईल. या योजनेच्या अधिक माहितीसाठी आजच आमच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा आणि तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी योग्य निर्णय घ्या.
मोबाईल बँकिंग
श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.मधील खातेधारकांचे दैनंदिन व्यवहार अधिक गतिपूर्ण, तसेच कॅशलेस व्हावेत यासाठी ही सुविधा दिली जात आहे. यात मोबाईल फोनद्वारे पैसे देणे-घेणे, बिल भरणे, खात्यातील शिल्लक तपासणे इ. सुविधा संस्थेच्या मोबाईल अँप द्वारे तुम्हाला पुरवल्या जातात.


IMPS सुविधा
श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.मधील खातेधारकांना पेपरलेस व्यवहार करता यावेत यासाठी IMPS ही सुविधा दिलेली आहे. या मार्फत तुम्हाला चेक क्लिअरन्स सुविधा, भारतात कुठेही पैसे पाठविण्याची आणि स्विकारण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
SMS बँकिंग
तुमचे सर्व व्यवहार आता तुमच्या फोनवर करणे सहज शक्य होणार आहे. श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. ची SMS BANKING ही सुविधा आहे. त्याद्वारे तुम्हाला पैसे ट्रान्सफर केल्याचे आणि खात्याबद्दलचे सर्व अपडेट्स मिळू शकतील.


RTGS सुविधा
श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.मधील आरटीजीएस प्रणालीद्वारे तुम्हाला एका खात्यातून दुसऱ्या खात्यात निधी हस्तांतरित करता येऊ शकते. तुम्हाला २ लाखांहून अधिक रकमेचे व्यवहार करता येणे शक्य असते. शिवाय भारतात कुठेही पैसे पाठविण्याची आणि स्विकारण्याची सुविधाही यात उपलब्ध करून दिली आहे.
NEFT सुविधा
श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.मधील खातेधारकांना NEFT या सुविधेद्वारे भारतात कुठेही पैसे पाठविणे आणि स्विकारणे सोपे होते. NEFT द्वारे तुम्ही 2 लाखांपेक्षा कमी रक्कम हस्तांतरित करू शकता.
