
श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. धाराशिव
‘विश्वासातून प्रगतीकडे’ अशी ओळख निर्माण झालेली संस्था म्हणजेच ‘श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट’ को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. उस्मानाबाद. संस्थेची मंजूरी दिनांक १२ सप्टेंबर २०११ रोजी केद्रीय निबंधक, दिल्ली यांच्याद्वारे मिळाली तर दिनांक २० ऑक्टोबर २०११ रोजी संस्थापक अध्यक्ष श्री. दत्तात्रय कुलकर्णी यांनी मुख्य शाखा उस्मानाबाद येथे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करून समृद्धीच्या कार्याला सुरुवात केली. सुरक्षित व सर्वोत्तम सेवेमुळे अल्पावधीतच या संस्थेच्या येडशी, बेंबळी, मुरुड, तुळजापूर, तेर, समर्थनगर (कोर्ट), गवळी गल्ली, आरळी या शाखा कार्यान्वित करण्यात आल्या.
अनेक ग्राहकांचा आर्थिक आधारस्तंभ बनलेली ही संस्था ‘डिजिटल बँकिंग’ ग्रामीण भागातील ग्राहकांपर्यंत पोहचवण्यात यशस्वी ठरलेली आहे. काळानुरूप बदल करत ग्राहकांपर्यंत विविध सेवा देण्यात ही संस्था कायम सक्षम राहिलेली आहे. ३०० उद्योजकांना आपल्या संस्थेने कर्ज देऊन त्यांच्या स्वप्नांना हातभार लावलेला आहे. आज ही संस्था ३०० उद्योजक निर्माण करण्यात यशस्वी तर झालेली आहेच तसेच ही संस्था महिलांच्या बाबतीतही विचाराने अग्रेसर असल्याने १०० महिला उद्योजक निर्माण करण्यास यशस्वी झालेली आहे. महिला सक्षमीकरण हा संस्थेचा दृष्टीकोन असल्याने महिला बचत गटाच्या माध्यमातून आणखी ५०० महिला व साहित्य निर्माण करण्याचे संस्थेचे ध्येय आहे.
संस्थेच्या सुरुवातीपासूनच संस्थापक अध्यक्ष व संचालक मंडळ यांच्या प्रामाणिक प्रयत्नामुळे ‘श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट’ ही जिल्ह्यातील एक अग्रणी व विश्वासार्ह संस्था बनलेली आहे.
दृष्टीकोन आणि उद्दिष्ट
दृष्टीकोन
ग्राहकांसाठी सहज, वेगवान आणि उच्च दर्जाच्या बँकिंग सेवा उपलब्ध करून देत, संपूर्ण महाराष्ट्रात शाखांचे विस्तारीकरण करणे.
- शाखांचा विस्तार
- उत्तम सेवा
- विश्वासार्हता

उद्दिष्ट
सर्वसामान्य लोकांना आर्थिक सक्षमता देण्यासाठी उत्तम वित्तीय सेवा प्रदान करणे, पारदर्शकता, विश्वासार्हता आणि सतत नाविन्याच्या माध्यमातून सदस्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणे.
- आर्थिक समृद्धी
- सुविधाजनक व्यवहार.
- सुरक्षितता आणि गोपनीयता
- ग्राहक समाधान


संस्थापकांचे मनोगत
श्री. दत्तात्रय कुलकर्णी
सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार आपली सेवा करण्याची संधी आम्हांला दिली. आपल्या विश्वासाच्या बळामुळे ‘श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट’ संस्था उभी राहू शकली आणि यशस्वी वाटचाल करत आहे. या विश्वासामुळे संस्थेचे २०००० सभासद होऊ शकले. या संस्थेचा प्रत्येक कर्मचारी उत्तम सेवा ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्नशील असतो. खातेदारांना सर्व आधुनिक सेवा - सुविधा संस्थेमार्फत मिळाव्या आणि त्यांचा बँकिंगचा अनुभव अधिक सुखकर व समाधानकारक व्हावा यासाठी संस्था कायम प्रयत्नशील असते. आजपर्यंत तुम्ही जी साथ दिली, ही मोलाची साथ अशीच भविष्यातही राहो अशी अपेक्षा करतो.
शाखा
दिवस अखंड सेवा
सभासद
अविरत सेवा


मला बचत करायची होती.मी माझी बचत श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि मध्ये ठेवायला सुरूवात केली. मला माझ्या बचतीवर आकर्षक व्याजही मिळायला लागले. त्यामुळे माझे गाडी घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले. श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट कडे तुमची गुंतवणूक एकदम सुरक्षित राहते. त्यामुळे तुम्हीही येथे खाते उघडा आणि आकर्षक योजनांचा लाभ घ्या.


मला व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरक्षित ठिकाणाहून भांडवल हवे होते. दरम्यान मला श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि विषयी कळले. मी तात्काळ अर्ज केला आणि मला कर्ज मिळाले. आज त्यांच्यामुळे माझा व्यवसाय अतिशय उत्तम सुरू आहे. शिवाय माझे भविष्यही सुरक्षित आहे.


वैयक्तिक अडचणी सांगून येत नाही. तसेच माझ्याबाबतीत झाले. अचानक मोठी अडचण आली. त्यातून बाहेर पडण्यासाठी मला वैयक्तिक कर्ज हवे होते. ते सुरक्षित ठिकाणाहून घ्यावे हाच विचार होता. अशावेळी मदतीला आली ती श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. ची 'वैयक्तिक कर्ज योजना'. या योजनेमुळे मला तत्काळ कर्ज उपलब्ध झाले आणि माझी अडचण सोडविण्यासाठी मोठा हातभार मिळाला. त्यामुळे आज मी निश्चिंत आहे.


श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. च्या मोबाईल बॅंकिंग सुविधेमुळे आता माझे व्यवहार अधिक फास्ट झाले आहेत. मोबाईल फोनद्वारे पैसे देणे-घेणे, बिल भरणे, खात्यातील शिल्लक तपासणे आदी गोष्टी मला सहज जमतात. दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागत नाही.शिवाय सुरक्षित आणि खात्रीशीर माहिती मिळते. त्यामुळे इथे खाते सुरू केल्याचा मला आनंद आहे.
